वसुधाताई देशमुख, माजी राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्षा, श्रमसाफल्य फाउंडेशन

मनोगत

कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती हे जिल्हा स्तरावर काम करणारे स्वयंपूर्ण केंद्र आहे, श्रमसाफल्य फौंडशन अमरावती या संस्थे द्वारा संचालित असून भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारा पुरस्कृत केंद्र सन १९९५ पासून कार्यरत आहे .
 कृषी विज्ञान केंद्र मार्फत शेतकर्यांना  प्रत्यक्ष त्यांच्या गावामध्ये जाऊन कृषी निगडीक तांत्रिक माहिती पोहचविण्याचे कार्य केले जाते. शेतक-यांच्या शेतावर चाचण्या (On Farm Trials) घेऊन, त्यातील निष्कर्षानुसार तंत्रज्ञानातील बारकाव्यात फेरबदल करणे आणि आपल्या शेत्रातील उपलब्ध परिस्थितीनुसार शिफारस केली जाते .
कपाशी, तेलबिया व कडधान्य, कृषी सुधारित अवजारे अशा विविध पिक  शेती  निगडीत  तंत्रज्ञानावर प्रथम पिकदर्शक प्रात्यक्षिक (Frountline Demonstration) कार्यक्रमांतर्गत प्रात्याक्षिके घेणे व मिळालेल्या निष्कर्षांची व समस्यांची माहिती शास्त्रज्ञाना पोहचवून नवीन संशोधनाची दिशा ठरविण्यात मदत आम्ही करतो.
शेतकरी, युवक, महिला व कृषी विस्तारक यांना त्यांच्या व्यवसयातील कार्यकुशलता वाढविण्यासाठी प्रशिक्षण देतो. आम्ही समाजातील आर्थिक दुष्ट्या मागासलेल्या घटकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या आर्थिक सामाजिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास मदत करतो.
शिवार फेरी, शेतकरी मेळावे, परिसंवाद, कृषी दिन, शैषणिक सहली, अभ्यास दौरे, कृषी प्रदर्शन, वृत्तपत्रे व मासिके, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी कार्यक्रमाद्वारे सुधारित तंत्रज्ञान शेतकर्यानपर्यंत  पोहचविण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र अमरावतीत सुरु केले आहे.

ग्रामीण महिलांसाठी वैयक्तिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, गृह व्यवस्था, आहार पद्धती, बाल संगोपन, स्वयं रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण आम्ही देतो.  कृषी विज्ञान केंद्रचे प्रषेत्र, प्रात्यक्षिक प्रक्षेत्र असल्यामुळे विध्यार्थी, युवक / महिला, शेतकरी यांना प्रक्षेत्रावर बोलावून शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या पर्यंत पोहचवितो.
सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करते कि , हे कृषी विज्ञान केंद्र आपल्या साठी सुरु झालेले आहे त्यामुळे आपण येथे जाऊन उपलब्ध  असलेल्या तज्ञ  मंडळी व तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा

 

Copyright Krishi vigyan kendra Ghatkhed Amravati
Design by Pratik Ghogare, Programme Assistant (Computer) KVK Ghatkhed, Amravati 9423154300